बाप रे.. तीन एकरावरील कपाशीवर तणनाशक फवारले!

सप्टेंबर 13, 2022 7:40 PM

pachora News-जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारात शेतांमधील उभ्या कपाशीच्या तीन एकर पिकावर तणनाशक फवारल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा व झालेल्या प्रकारचा तपास करून तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

jalgaon 2022 09 13T193933.753

रमेश काशीराम पाटील, नवाब तडवी, लतिफ तडवी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल प्रशासनाने संबंधित शेतकर्‍यांच्या शेताचा पंचनामा करून त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळऊन द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी केली आहे. तणनाशक कोणी फवारले ? वा उपद्रवीला ही बाब करण्यास कुणी सांगितली ? की त्याने स्वतः हे कृत्य केले ? याचा तात्काळ तपास करण्याची मागणी रमेश पाटील, लतीफ तडवी, नवाब तडवी या शेतकर्‍यांनी केली आहे. माथेफिरूचा शोध लावुन त्यास योग्य ते शासन करावे, अशी मागणी परीसरातील इतर शेतकर्‍यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now