---Advertisement---
गुन्हे चोपडा

बाप रे.. गलंगीला महिलेचा सावत्र मुलानेच केला खून

---Advertisement---

Chopada News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । सध्या जिल्ह्यासह ग्रामीण भागात खुनाचे प्रमाण वाढले असून चोपडा तालुक्यातील गलंगी येथे ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात लाकडी दांडा मारून मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील संशयीत आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

crime 2022 07 10T132917.331 jpg webp

सहाबाई शिवराम बारेला (45, गलंगी, ता.चोपडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हा खून संशयीत आरोपी दीपक मगन बारेला (25) याने केल्याचा आरोप असून त्यास चौकशीकामी अटक केली आहे. दीपक बारेला यांची सहाबाई बारेला ही सावत्र आई असून ती मुलाला व्यवस्थित वागणूक देत नसल्याने या प्रकाराला दीपक वैतागला होता. रविवारी रात्री उभयंतांमध्ये याच कारणावरून वाद झाला व संतप्त मुलाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

---Advertisement---

चोपडा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, उपनिरीक्षक अमर वसावे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत नेमका प्रकार जाणून घेतला. संशयीत तरुणाला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून घडलेल्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेतली जात आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---