---Advertisement---
नोकरी संधी

सरकारी बँकेत ‘शिपाई’ पदांसाठी जम्बो भरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास अन् पगार 37000

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी पास असाल आणि सरकारी बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदासाठी मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.

image 2

इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या www.bankofbaroda.in या वेबसाईटवर जाऊन सविस्तर माहिती वाचू शकतात. या भरती अंतर्गत एकूण ५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे २०२५ पर्यंत आहे. Bank of Baroda Peon Bharti

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (शिपाई)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयोमर्यादा : अर्जदारांचे किमान वय १ मे २०२५ रोजी १८ वर्षे आणि कमाल वय २६ वर्षे असावे. म्हणजेच, उमेदवारांची जन्मतारीख १ मे १९९९ पूर्वीची आणि १ मे २००७ नंतरची नसावी. राखीव श्रेणींना उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल.

किती पगार मिळेल?
बँक शिपाई पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १९५०० रुपये ते ३७,८१५ रुपये पगार मिळेल.
निवड प्रक्रिया- उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

अर्ज शुल्क- अर्ज करताना सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी, माजी सैनिक, डीआयएसएक्सएस आणि महिला उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

1 thought on “सरकारी बँकेत ‘शिपाई’ पदांसाठी जम्बो भरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास अन् पगार 37000”

Leave a Comment