जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने अप्रेंटिस भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेत सुमारे २,७०० पदे भरली जातील.ही पदे विविध राज्यांमध्ये भरली जातील. Bank of Baroda Apprentice Bharti

तुम्ही जर फ्रेशर्स असाल तर तुमच्याकडे नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट, bankofbaroda.in किंवा apprenticeshipindia.gov.in ला भेट देऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ डिसेंबर २०२५ आहे. Bank of Baroda Recruitement Bharti

पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच अर्ज करण्यासाठी किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे आहे. विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात पाच वर्षांची सूट दिली जाईल, तर ओबीसी उमेदवारांना वयात तीन वर्षांची सूट दिली जाईल आणि अपंग उमेदवारांना वयात १० वर्षांची सूट दिली जाईल.

या नोकरीसाठी ट्रेनिंगचा कालावधी हा १२ महिन्यांचा असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला दर महिन्याला १५००० रुपये पगार मिळणार आहे
निवड प्रक्रिया कशी पार पाडली जाईल?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि स्थानिक भाषा चाचणीच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० बहुपर्यायी प्रश्न असतील, ज्यामध्ये सामान्य आणि आर्थिक जागरूकता, संख्यात्मक अभिरुची, तर्क, संगणक ज्ञान आणि सामान्य इंग्रजी यांचा समावेश असेल. परीक्षेचा कालावधी एक तास आहे. यशस्वी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि स्थानिक भाषा चाचणी दिली जाईल.






