⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | महाराष्ट्र | नोव्हेंबरमध्ये १७ दिवस बँकांना सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

नोव्हेंबरमध्ये १७ दिवस बँकांना सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । पुढील आठवड्यापासून नोव्हेंबर २०२१ महिन्याला सुरुवात होणार आहे. हा नोव्हेंबर महिना सणांचा असून या महिन्यात बँकां तब्बल १७ दिवस बंद राहणार आहेत.  धनत्रयोदशी, दिवाळी, भाई दूज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या या महिन्यात पडणार आहेत. परंतु यात काही राज्यांमध्ये बंद बंद राहणार असून तर काही राज्यांमध्ये बँका सुरु राहणार आहे. जर बँकेचे काही कामे हाताळणे असतील तर आताच करून घ्या. जेणे करून कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

पुढील महिन्यात RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय, चार रविवार आणि महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार सुटी आहे.

यासोबतच कोणत्या राज्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील आणि कुठे सुरू राहतील हेही सांगण्यात आले आहे. या आधारावर तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामाचा निपटारा करा जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही आणि कोणत्याही कामात व्यत्यय येणार नाही.

नोव्हेंबर 2021 मध्ये बँक सुट्ट्या

1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव / कुट – बेंगळुरू आणि इंफालमध्ये बँका बंद

3 नोव्हेंबर – नरक चतुर्दशी – बेंगळुरूमध्ये बँका बंद

नोव्हेंबर 4 – दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजा) / दीपावली / काली पूजा – बेंगळुरू वगळता सर्व राज्यांत बँका बंद

5 नोव्हेंबर – दिवाळी (बाली प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद

६ नोव्हेंबर – भाई दूज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मीपूजा / दीपावली / निंगोल चकोबा – गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद

7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

10 नोव्हेंबर – छठ पूजा / सूर्य षष्टी दला छठ – पाटणा आणि रांचीमध्ये बँका बंद

11 नोव्हेंबर – पटनामध्ये छठ पूजा – बँक बंद

१२ नोव्हेंबर – वांगळा उत्सव – शिलाँगमध्ये बँका बंद

13 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)

14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा – आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद आहेत.

21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरूमध्ये बँका बंद

२३ नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम – शिलाँगमध्ये बँका बंद

27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.