⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

वादळी वाऱ्याचा तडाखा, किनोदसह परिसरात केळी जमीनदस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२२ । राज्यासह जिल्ह्यात अनेक भागाला मान्सूनपूर्व पावसाच्या वादळ वाऱ्याने झोडपून काढले आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक परिसरात मोठे नुकसान झाले, काल दि.९ रोजी रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे किनोदसह परिसरात केळी जमीनदस्त झाल्या असून शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील किनोदसह परिसरात वादळाने काल दि. ९ रोजी रात्रीच्या वेळी हाजरी लावली. या नैसर्गिक संकटाने केळी पूर्ण भुईसपाट झाली आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहे. तसेच महावितरणच्या तारांवर झाड पडल्याने विज कालपासून गायब झाली आहे. या आलेल्या वादळाचा सर्वाधिक फटका केळी पिकांना बसला आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी वर्ग कमालीचा हवालदील झाला आहे. दरम्यान, या नुकसानीचे तात्काळ पंचनावे व भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.