जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । जागतिक महिला दिनानिमित्ताने धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे समता फौंडेशन,मुंबई व चांदसर आरोग्य केंद्रातर्गत बांभोरी उपकेंद्र व बांभोरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गर्भवती महिला, कुपोषित बालक व अती जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कुपोषित बालकांना व गर्भवती मातांना समता फौंडेशन आणि बांभोरी उपकेंद्रतर्फे मोफत औषधोपचार करण्यात आले. बांभोरी गावातील गर्भवती माता व मुलांना सुदृढ आयुष्य मिळावे, यासाठी ग्रामपंचायत व उपकेंद्रतर्फे सर्व उपाययोजना करण्यात येतील असे मत बांभोरी प्रचा’चे सरपंच सचिन बिऱ्हाडे यांनी व्यक्त केले. तसेच मुलांना व मातांना आरोग्य विषयक घ्यावयाच्या काळजी बाबत व महिलांना होणाऱ्या स्तनाचा, गर्भाचा व इतर कर्करोग बद्दल आरोग्य अधिकारी डॉ.प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले.समता फौंडेशन, मुंबई चे राजेंद्र दोंड यांनी समता फौंडेशन’च्या ग्रामीण भागातील कुपोषित बालक व गर्भवती माता च्या आरोग्यासाठी कार्यतत्पर राहील माहिती दिली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप कोळी, MPW प्रशांत पाटील, ANM प्रीती निकम, आशा सेविका-सपना नन्नवरे, अंजना नन्नवरे, सोनी नन्नवरे व गावातील युवक-युवती महिला व बालक यांची प्रमुख उपस्थिती होती.