संजय राऊतांना अटक झाल्याने बाळासाहेब ठाकरेंच्या वाहन चालकाने वाटले पेढे
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑगस्ट २०२२ । शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. यामुळे प्रकाश राजपूत या बाळासाहेबांच्या वाहन चालकाने पेढे वाटले आहेत. दिल्ली येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांनी हे पेढे वाटले. १९९३ ते २००० या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीवर चालक म्हणून काम केल्याचं सांगित. असे वृत्त नुकतेच एका वृत्त वाहीनीने प्रकाशित केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्वी गाडीचे सारथी असलेले प्रकाश राजपूत यांनी दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन पेढे वाटले. संजय राऊतांच्या अटकेमुळे मला खूप आनंद झाला आहे. राऊत यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले आहे. २०२४ पर्यंत राऊत यांना तुरुंगातून बाहेर काढू नका असे यावेळी राजपूत म्हणाले.
एकूणच शिवसेनेतील बंडखोर गटाकडून वारंवार ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप करत ठाकरे कुटुंबाला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. अशातच आता प्रकाश राजपूत या बाळासाहेबांच्या जुन्या चालकाने खासदार शिंदेंची दिल्लीत भेट घेऊन दिलेल्या या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा आहे.