---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर

जळगावात राज्यस्तरीय स्व.बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेला दणक्यात सुरुवात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । हिंदुहृदसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना (ठाकरे गट) जळगाव महानगर आणि कैलास क्रीडा मंडळ यांच्या वतीने बाळासाहेब ठाकरे भव्य कबड्डी स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. दि.२१ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान शिवतीर्थ मैदानावर पार पडणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेला शनिवारी दणक्यात सुरुवात झाली.

shivsena6 jalgaon jpg webp webp

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पदवीधर निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन लढ्ढा, नगरसेविका ज्योती तायडे, लक्ष्मीकांत चौधरी, राजू चौधरी, अजय जाधव, नारायण खडके, मंगला पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

---Advertisement---

उद्घाटनप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ललित धांडे, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, विमल माळी, प्रशांत सुरळकर, पूनम राजपूत आदींसह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी झालेले पुरुष संघ
स्पर्धेत पुरुष गटात महर्षी फाउंडेशन जळगाव, ओम साई मंडळ विखरण, शिवनेरी क्रीडा मंडळ जळगाव, कैलास क्रीडा मंडळ जळगाव, सर्वोदय क्रीडा मंडळ जळगाव, हिंद केसरी क्रीडा मंडळ धुळे, एनटीपीसी क्रीडा मंडळ नंदुरबार, महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ जळगाव, नेताजी सुभाष मंडळ जळगाव, हनुमान व्यायाम शाळा जळगाव, जागृती क्रीडा मंडळ बुऱ्हानपूर, क्रीडा रसिक मंडळ जळगाव, स्वामी स्पोर्ट्स, रावेर, आर.सी.पटेल शिरपूर, जय हिंद क्रीडा धुळे हे संघ सहभागी झाले आहेत.

महिला संघ
महिला गटात जय मातृभूमी, भुसावळ, स्वामी स्पोर्ट्स, रावेर, मोरया क्रीडा, जळगाव
अष्टविनायक क्रीडा मंडळ, चोपडा, एकलव्य क्रीडा मंडळ जळगाव, मुक्ताई युवा मंडळ मुक्ताईनगर, आर.सी पटेल क्रीडा ,शिरपूर, सरदारजी क्रीडा मंडळ,रावेर या संघांनी सहभाग नोंदविला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---