---Advertisement---
अमळनेर

ईदगाह मैदान सुने : अमळनेरात बकरी ईद साधेपणाने साजरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । कोरोना पार्श्वभूमीवर शहर व परिसरात मुस्लीम बांधवांनी बकरी ईद (ईद-उल-अज्हा) बुधवारी (दि.21) अत्यंत साधेपणाने साजरी केली. सामुहिकरित्या विशेष नमाजपठणाचा सोहळा पुर्णपणे रद्द केला गेला. 

amalner 1

यामुळे शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर शुकशुकाट पहावयास मिळाला.त्याग, बलिदानाची शिकवण देणारा बकरी ईदचा सण अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शहर-ए-खतीब नौशाद आलम यांच्यासह शहरातील विविध धर्मगुरू व उलेमांनी केले होते. सामुहिकरित्या ईदगाहवर तसेच विविध मशिदींमध्ये नमाजपठणासाठी गर्दी करू नये, असेही सांगण्यात आले होते. 

---Advertisement---

यानुसार शहरातील मशिदींसह ईदगाहवर शासनाच्या नियमानुसार नमाजपठण केले गेले ईदगाहवर पुर्वसंध्येपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच गुरूवारी सकाळी जापानजीन,ख्वाजा नगर, दर्गाह अली, अंदरपुरा, बाहेरपुरा, इस्लामपूरा, कसाली, शाह आलमनगर या भागांमध्ये मुस्लीमबहुल मोहल्ल्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बकरी ईदनिमित्त समाजबांधवांची सकाळपासूनच लगबग पहावयास मिळत होती. नमाजपठण सामुहिकरित्या न करता नवीन कपडे परिधान करून अबालवृध्दांनी आपापल्या घरांमध्येचे नमाजपठण, कुराणपठण करण्यास प्राधान्य दिले. यामुळे घराघरांमधून प्रार्थनेचे सुर सकाळी ऐकू येत होते. तसेच गल्ली-मोहल्ल्यातसुध्दा नागरिकांनी गर्दी न करता एकमेकांना शुभेच्छा दिल्या.कोरोना चे संकटातून सुटकेसाठी व देशातील एकोपा टिकून राहावं यासाठी विशेष दुवा करण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---