पाचोरा

पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर.. बहूळा धरण काठोकाठ भरले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही ठिकाणी नदी,नाले ओसंडून वाहत आहे. तर जिल्ह्यातील बहुतांश धरण काठोकाठ भरली आहेत. यात पाचोरा तालुक्याची संजीवनी असलेलं बहूळा धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे.

जून महिन्यात उघडीप दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक छोटी मोठी धरणे ओवरफ्लो झाली होती. मात्र बहूळा धरणात आतापर्यंत ३० टक्के जलसाठा होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यातच या सप्टेंबर महिन्यात देखील जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घेतला आहे. बहुतांश धरण ही १००% भरली गेली आहे. बहुळा प्रकल्पावर पाचोरा तालुक्यातील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. मात्र यंदाही धरण फुल झाल्याने अनेक गावांच्या वर्षभराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

दरम्यान, उगमस्थानावर जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरु आहे. प्रशासनाने रात्री पासून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. वेरुळी खु” व वेरुळी बु” या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे लोकांना सावधानी बाळगण्याचा इशारा राहुल शेवाळे शाखा अभियंता बहूळा मध्यम प्रकल्प वेरुळी यांनी दिला आहे.

उतावळी लाही पुर
बहुधा धरणाच्या खालच्या बाजूने येणारी उतावळी नदीचा उगम हा वाकडी कोकडी धरणाच्या वरती जंगलात आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण भरल्याने या उतावळी नदीला पूर आला आहे. लोहारा, सांगवी, साजगाव मार्गे ती नदीचे खेडगाव हुन बहुधा नदीतून गिरणा नदीला मिळते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button