---Advertisement---
एरंडोल जळगाव जिल्हा

एरंडोल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी संस्थेच्या 96% निकाल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । एरंडोल येथील शास्त्री फौंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी संस्थे मधील बी. फार्मासीचा निकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रंज्ञान विद्यापीठ लोणेरे जि. रायगड यांनी जाहीर केला आहे. संस्थापक प्रा. डॉ. विजय शास्त्री यांच्या अनमोल मार्गदर्शनात मागील वर्षाप्रमाणे यशाची परंपरा कायम राखत प्रथम वर्ष बी. फार्मसी चा निकाल ९६ टक्के लागला आहे.

यात प्रथम क्रमांक वैष्णवी प्रवीण सोनार (सीजीपीआय नुसार ९.७२)व्दितीय क्रमांक योगिनी नितीन राणे (९.४७) तृतीय क्रमांक निखिल सुरेश पाटील (९.४४) यासह लुनेश विजय पाटील (९.३३) तृप्ती भागवत चौधरी (९.३१) अनिकेत सुरेश पाटील (९.३०) व तेजस प्रकाश साळी (९.३०) गुण मिळवून यश मिळवले.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री, प्रा. गोपीचंद भोई, प्रा. राहुल बोरसे, प्रा. करण पावरा, प्रा. अनिता वळवी, प्रा. हेमंत चौधरी, प्रा. महेश पाटील, पी. आर. ओ. शेखर बुंदेले, कार्यालयीन प्रमुख नाना पाटील यांनी कौतुक केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---