गरजेनुसारच अ‍ॅन्टीबायोटीक्स औषधांचे सेवन करा

नोव्हेंबर 18, 2025 4:51 PM

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात अ‍ॅन्टीबायोटीक्स औषधांवर जनजागृती सप्ताह

Awareness week on antibiotics

जळगाव लाईव्ह न्यूज । अ‍ॅन्टीबायोटीक्स अर्थात प्रतिजैविक औषधे घेतांना अत्यंत काळजी घेतली पाहिजे. वैद्यकीय तज्ज्ञांनी सुचविल्यानुसारच प्रतिजैविक औषधांचे सेवन अर्धवट न करता ते पूर्ण करावे. तसेच वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील आवश्यक तेवढीच प्रतिजैविक औषधे रूग्णाला सुचवावित अशी माहिती मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी दिली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रतिजैविक प्रतिरोधक जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, मेंदू व मणका शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड, डॉ. सुभाष बडगुजर,डॉ. चंदन साबळे, डॉ. अब्दुल्लाह, परिचारीका विभागाचे प्रमुख संकेत संकपाळ, प्रशासन अधिकारी अशोक भिडे, अशोक बर्‍हाटे, यांच्यासह रूग्ण, आणि वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात पोस्टरद्वारे डॉ. कैलास वाघ यांनी औषधांना पूरक म्हणून देण्यात येणार्‍या अ‍ॅन्टीबायोटीक्स (प्रतिजैविक) औषधांच्या वापराविषयक सखोल माहिती देत मार्गदर्शन केलेे. तसेच प्रतिजैविक औषधांच्या वापारासंबंधी संपूर्ण सप्ताहाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाणार असल्याचे ते म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now