प्रवर्तन फाउंडेशनतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांना जनजागृतीपर पथनाट्य
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालय, जळगाव येथे प्रत्येक तालुक्यातून दिव्यांग बांधव हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या प्रक्रियेसाठी येत असतात. परंतु त्यांना माहिती नसल्याने त्यांची धावपळ सुरू असते आपल काम पुर्ण झालं नसल्याने ते नाराज होऊन गावाकडे परत जातात. यात त्यांचा वेळही जातो आर्थिक स्थिती ही खालावते आणि दिव्यांगाला पुन्हा पुन्हा आणतांना अडचणींना तोंड द्यावे लागते. ते त्यांना समजावं म्हणून प्रवर्तन फाउंडेशन नांदगाव ता.बोदवड या सामाजिकसंस्थेने पथनाट्य सादर करून ऑनलाईन अर्जभरण्याची प्रक्रिया, प्रमाणपत्र डाउनलोड करणे ,UDID कार्ड कसे मिळेल, प्रमाणपत्र रिनीव्ह करणे , एजेंट पासुन सावध राहिने यावर मार्गदर्शन केले. तसेच दिव्यांन बांधवांच्या सोईसाठी चार बॅनर दिव्यांग मंडळाच्या परिसरात लावण्यात आले.
या कार्यक्रमात शा.वै.म.व रू.चे अधिष्टाता डॉ.जयप्रकाश रामानंद दिव्यांग मंडळाचे अध्यक्ष मारोती पोटे व त्यांचे सहकारी प्रवर्तन फाउंडेशनच्या अध्यक्षा दिव्या पालवे, विकास वाघ व पथनाट्याची टीम, कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वजीत, डॉ.धर्मेश पालवे, अशोक नागदेव, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट विजयेंद्र पालवे, ऋषिकेश शिंपी, विनोद सोनवणे आदीनी परिश्रम घेतले.