जळगाव शहर
प्राध्यापिका संगीता चंद्रात्रे यांना पी.एच.डी.प्रदान
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्राध्यापिका संगीता जगदीश चंद्रात्रे यांना “बायोगॅस”या विषयावर पी.एच.डी.प्रदान करण्यात आली.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सायन्स अँण्ड टेक्नॉलॉजी विद्याशाखेअंतर्गत सुक्ष्म जीवशास्त्र विषयात “बायोगॅस प्रॉडक्शन युझिंग रिजनल लिग्नोसेल्युलोसिक बायोमास” या विषयावर पी.एच.डी.डिग्री प्रदान करण्यात आली. मू.जे.महाविद्यालयातील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख, प्रोफेसर डॉ. केतन प्रेमचंद नारखेडे हे त्यांचे मुख्य मार्गदर्शक होते. जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगांव चे चेअरमन अशोक जैन आणि टेक्निकल मॅनेजर अँण्ड डेप्युटी क्वालिटी मॅनेजर आर अँण्ड डी प्रमुख डॉ.सुधान्शु भारद्वाज यांचे त्यांना अनमोल मार्गदर्शन लाभले.