---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

बदलीनंतरही दप्तर देण्यास टाळाटाळ ; ग्रामसेविका तुरुंगांत, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईचा दणका

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । बदली होऊन दीड वर्षानंतरही ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांनी दप्तर देण्याच टाळले होते. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता. तरी दप्तर न दिल्यामुळे बाविस्कर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा दणका दिला. असून, दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस तुरुंगांत न्यायालयीन कोठडी टाकण्याचे निर्देश दिले आहे.

किन्ही ( ता. भुसावळ )  येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणाऱ्या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कारवाईचा दणका दिला आहे. वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस तुरुंगांत न्यायालयीन कोठडी टाकण्याचे निर्देश दिले आहे. यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे. महिला ग्रामसेविकेस थेट न्यायालयीन कोठडी देण्याची ही पहिलीच घटना आहे.

---Advertisement---

जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी यासंबंधीची तक्रार केली होती. तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी चुंचाळेला(ता. यावल) बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४ वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता.तरी दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---