वाणिज्य

‘या’ शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत ; १ लाखाचे झाले ९ लाख

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । टाटा समूहात एकापेक्षा जास्त कंपन्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच एका कंपनीच्या शेअरबद्दल सांगणार आहोत. या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आजपासून वर्षभरापूर्वी जर कोणी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची किंमत आता 9 लाख रुपये झाली असती. तर चला जाणून घेऊया या अप्रतिम शेअरबद्दल…

टाटा समूहाच्या या शेअरचे नाव ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंबली आहे. दरम्यान, टाटा या कंपनीच्या नावाशी जुडलेली नाहीय. अशा परिस्थितीत ही टाटा समूहाची कंपनी आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. ही कंपनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरली आहे.

1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीचे झाले 9 लाख
एखाद्याने ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंब्लीमध्ये वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर त्याची किंमत सध्या सुमारे 9 लाख रुपये आहे. ही टाटा समूहाची स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी 6 सप्टेंबर 2021 रोजी या कंपनीचा स्टॉक 53 रुपयांच्या आसपास होता. त्याच वेळी, या शेअरची किंमत आज 477 रुपये आहे. जर एखाद्याने गेल्या वर्षी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची किंमत यावेळी सुमारे 9 लाख रुपये असेल.

ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग आणि असेंबलिंगचा शेअर आज NSE वर सुमारे Rs 471 च्या पातळीवर बंद झाला. आज बीएसईवर या शेअरची नीचांकी पातळी 468.65 रुपये आहे. तर सर्वोच्च पातळी 515.80 रुपये आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला एका वर्षातील सर्वोच्च आणि नीचांकी पातळी जाणून घ्यायची असेल, तर एनएसईमध्ये असे झाले आहे. त्याची वर्षाची निम्न पातळी 54.00 आहे आणि उच्च 925.45 रुपये आहे.

(टीप : येथे कुठलाही गुंतवणुकीला सल्ला दिलेला नाहीय. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा..)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button