जळगाव जिल्हा

“कलावंतांने शोधक असावे, तपासत जावे स्वतःला ” अतुल पेठे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज | ३० जुलै २०२१| नाटक ही सहज, सोपी व साधारण करण्याची गोष्ट नसून ती अतिशय गंभीर होऊन करावयाची कला आहे. नटाचे शरीर तंदुरुस्त असेल तर मन ही उत्तम असतं म्हणून नटांनी काळजी घेतली पाहिजे, असे मत जेष्ठ नाटककार व दिग्दर्शक अतुल पेठे यांनी परिवर्तन आयोजित दोन दिवसीय “रंगसंगत” नाट्य शिबीरात व्यक्त केले. या कार्यशाळेचे उद्घाटन जळगावचे रंगकर्मी अनंत उर्फ बंटी जोशी, अथर्व प्रकाशनाचे युवराज माळी यांच्या हस्ते घंटानाद करून करण्यात आले. याप्रसंगी परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील, वसंत गायकवाड, शिबीर प्रमुख नारायण बाविस्कर, मंजुषा भिडे उपस्थित होते.

कार्यशाळेत सिने अभिनेता व नाटककार ओंकार गोवर्धन यांनीही मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी डॉ अमित पवार यांनी शरीराची ओळख करून दिली. या दोन दिवसात भाषे विषयी,नाटक ही एक निरंतर चालणारी कलेची प्रक्रिया आहे . अभिनय देखील अशीच गुंतागुंतीची प्रक्रिया असून तिचा संबंध हा आपल्या भावभावना सोबत आहे तितकाच तो बुद्धी सोबत देखील आहे . या साठी नाटक समजून घेणे, काय वाचावे, पहावे, आवाजाविषयी , स्वर जो हॅरीची चौथी खिडकी, स्वतःचा शोध घेणे या सारख्या अनेक विषयांवर चर्चा व प्रात्याक्षिके , नाट्य खेळ असे विविध प्रकार या कार्यशाळेत अतुल पेठे व ओंकार गोवर्धन यांनी शिबिरार्थींकडून करून घेतले. मराठी रंगभूमीचा १८० वर्षांच्या इतिहासाचा धावता आढावा अभिनेता ओंकार गोवर्धन यांनी मांडला. तसेच जागतिक रंगभूमीविषयी विचार मांडले. संत तुकारामांच्या अभंगांचे नाट्यमय सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. शिबिरासाठी रंगकर्मी व शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड सुशील अत्रे यांचे सहकार्य लाभले आहे. कार्यशाळे शिबिरात १६० अर्जांपैकी फक्त २० विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली होती. यात जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, अमळनेर व यावल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी होरिलसिंग राजपूत, मंगेश कुलकर्णी, सुनील बारी, राहुल निंबाळकर, अभिजीत पाटील , यांनी परिश्रम घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button