जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२२ । भुसावळ येथे महिला क्रीडा मंडळातर्फे शहरात प्रथमच महिलांच्या क्रिकेट स्पर्धेचे १५ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेपाच ते साडेनऊ या वेळेत रेल्वे मैदानावर या स्पर्धा होतील.
या स्पर्धेत फक्त तीन संघांचा सहभाग असेल. महिला महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट चेअरमन प्राची राणे, सचिव लता होसकोटे यांच्या नेतृत्वाखाली सहा षटकांच्या स्पर्धा होतील. स्पर्धा आयोजनासाठी मंडळाच्या सदस्या प्रभा पाटील, अनिता कवडीवाले, वैशाली बऱ्हाटे, सुरेखा चौधरी, ममता पाटील, मंगला पाटील, चारू महाजन, वैशाली भगत, किरण चौधरी, राजश्री कात्यायनी, रश्मी ठोसर इत्यादी महिला मंडळीचे सहकार्य करत आहेत.