विद्यार्थ्यांनो लक्ष द्या : विद्यापीठ-जळगाव बस सेवा सुरु होणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । जळगाव शहरातील जुने बस स्थानक ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बस सेवा सुरु होणार आहे, हि सीटी बससेवा पुन्हा सुरू करण्याचे निर्देशक विभागाने जरी केले आहे. विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी हे निर्देशक दिले आहे. (NMU – Bus)
या संदर्भातील माहिती अशी की, कोरोना काळापूर्वी जुन्या बस स्थानकापासून ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत सीटी बस धावत होत्या. मात्र ही बससेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे व विद्यार्थिनींचे मोठे हाल होत होते. अश्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्णपणे खासगी रिक्षा वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत होते. त्यांना अगदी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. यावर आता एसटी प्रशासनाने मार्ग काढला आहे. व सिटी बस सुरु केली आहे.
या पार्श्वभूमिवर, जुने स्थानक ते विद्यापीठ कँपस यांच्यात पुन्हा सीटी बससेवा सुरू करावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याला आता यश आले असून लवकरच ही बस सेवा सुरू होणार आहे. या संदर्भात एस.टी.चे विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत.