बातम्या

प्रवाशांनो लक्ष द्या : ऐनवेळी २२ रेल्वे गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२२ । मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नॉन मळ विभागातून धावणाऱ्या २२ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रेल्वे प्रवाशांची ऐनवेळी मोठी गैरसोय होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नागपूर विभागात स्टील साइडिंग चालू करण्यासाठी स्टेशनच्या पॅनेलचे यार्ड संशोधक आणि बदल रद्द करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. दरम्यान ६ ते १४ ऑगस्टदरम्यान हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ गाड्या रेल्वे प्रशासनाकडून रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला असून ऐनवेळी दुसन्या गाड्यांचे आरक्षण मिळणार कसे व इच्छितस्थळी प्रवास करावा कसा ? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. काही गाड्या एक दिवस तर काही गाड्या दोन दिवसांहून अधिक काळासाठी रद्द झाल्या आहेत.

या २२ गाड्या झाल्या रद्द: कंसात कालावधी
१८०३० शालिमार-लोकमान्य टिळक टमिर्नस १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते शालिमार (८ ते १२ ऑगस्टपर्यंत रद्द) २२८४६ हटिया- पुणे (८ ते १२ ऑगस्ट) तर (१० ते १४ ऑगस्ट), १३४२५ मालदा टाउन- सुरत (६ ते १३ ऑगस्ट), १३४२६ सुरत- मालदा टाउन (८ ते १५ ऑगस्टपर्यंत), २२५८९४ हावडा-शिर्डी साईनगर (११ ऑगस्ट), २२८९३ शिर्डी साईनगर-हावडा (१३ ऑगस्ट), २२९०५ ओखा- शालिमार (७ ऑगस्ट), २२९०६ शालिमार- ओखा एक्स्प्रेस (९ ऑगस्ट), १२८१२ हटिया-एलटीटी (१२ व १३ ऑगस्ट), १२८११ एलटीटी-हटिया (१४ व १५ ऑगस्ट), १२९०५ पोरबंदर-शालिमार (१० व ११ ऑगस्ट), १२९०६ शालिमार पोरबंदर (१२ व १३ ऑगस्ट), १२८१० हावडा-सीएसएमटी (८ ते १३ ऑगस्ट), १२८०९ मुंबई-हावडा (८ ते १३ ऑगस्ट), १२८३४ हावडा- अहमदाबाद (८ ते १३ ऑगस्ट), १२८३३ अहमदाबाद-हावडा (८ ते १३ ऑगस्ट), हावडा- पुणे व हावडा पुणे या गाड्या (८ ते १३ ऑगस्ट), १२१०१ एलटीटी-शालिमार (७ व ९ ऑगस्ट), १२१०२ शालिमार-एलटीटी ही गाडी (८, १० व ११ ऑगस्ट) रोजी रद्द आहेत.

Related Articles

Back to top button