जळगावकरांनो इकडे लक्ष द्या : ..अन्यथा तुमचे नळ कनेक्शन तोडले जाणार
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२३ । शहरातील मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा वाढत आहे. परिणामी शहरातील मुलभूत सुविधांसाठी मनपाला शासनाकडे हात पसरावे लागत आहेत. अनेक वेळा अभय योजना देवून देखील काही मालमत्ता धारकांकडन कर भरला जात नाही. आयुक्त पवार यांनी वसुलीसाठी काढलेल्या आदेशात जे थकबाकीदार महापालिकेला कर भरणार नाहीत, त्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
थकबाकी वसुलीची मोहिम मार्च अखेरपर्यंत सुरु राहणार असून यामध्ये थकबाकी न भरल्यास आधी नळकनेक्शन बंद करण्यात येणार आहे. तरीही मालमत्ताधारकाकडून थकबाकी भरली जात नसेल तर दोन दिवसानंतर संबधित मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात यावी, असे आदेश आयुक्त पवार यांनी दिले आहेत. वाढविण्यासाठी १२ पथक तयार केले असून यामध्ये १०७ कर्मचारी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच चालू वर्षीची कर वसुलीचे उद्दीष्टे ८३ कोटी रुपयांचे आहे. परंतु जानेवारी महिन्यापर्यंत ८३ कोटी पैकी ३४ कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. त्यामुळे मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी वसली आली आहे. वसुली पथकामध्ये महसुल उपायुक्त गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्र. सहाय्यक आयुक्त सुनिल गोराणे, प्र. सहाय्यक आयुक्त उदय पाटील, नगररचनाकार अशोक करवंदे, आरोग्य अधिकारी विकास पाटील यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.