⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | विशेष | Instagram युजर्स लक्ष द्या… ‘या’ हॅशटॅगवर क्लीक करताच अकाउंट होईल हॅक!

Instagram युजर्स लक्ष द्या… ‘या’ हॅशटॅगवर क्लीक करताच अकाउंट होईल हॅक!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । सध्याच्या तरुण पिढीची आवडती सोशल नेटवर्किंग साईट कोणती? असा प्रश्न विचारला तर कोणीही उत्तर देईल ते म्हणजे इंस्टाग्राम. (Instagram). व्हाट्सअप हे जसं एकमेकांना संदेश पाठवण्याचा साधन आहे. तसेच एकमेकांचे छान छान फोटो बघण्याचं साधन म्हणजेच इंस्टाग्राम. अशावेळी इंस्टाग्राम मध्ये काहीही झालं की त्याची चर्चा ही होणारच. सध्या इंस्टाग्राम वर चर्चा आहे ती हॅशटॅग एम्बेडेडची. (Instagram embeded Hashtag)

हॅशटॅग म्हटलं की सहज कोणालाही इंस्टाग्राम ची आठवण येतेच कारण इंस्टाग्राम मुळेच खऱ्या अर्थाने सर्वांना हॅशटॅग काय असतं हे समजायला सुरुवात झाली. #embeded कालपासूनच हॅशटॅग संपूर्ण इंस्टाग्राम वर ट्रेंड करत होत. यामुळे नक्की हा हॅशटॅग आहे तरी काय? हे जाणून घ्यायचा प्रयत्न सर्वच करतात तर जाणून घ्या हा हॅशटॅग नक्की आहे तरी काय?

 या हॅशटॅवर ज्यांनी क्लिक केलं त्यांचे अकाऊंट अचानक लॉगआऊट (Logout) झाले. यामुळे इन्स्टाग्राम यूजर्सचा गोंधळ उडाला. ज्यांना आपल्या अकाऊंटचा पासवर्ड माहिती होता, त्यांनी पासवर्ड परत टाकून आपलं अकाऊंट पुन्हा लॉग इन केलं. पण अनेक यूजर्सला त्यांच्या इन्स्टाग्रामचा पासवर्ड माहिती नव्हता त्यांना मात्र एकतर पासवर्ड रीसेट करावा लागला किंवा त्यांच अकाऊंट गमवावं लागलं आहे. 

मात्र असं कशामुळे होत आहे? एखादा हॅशटॅग असं कसं करू शकतो? असा प्रश्न सर्वांनाच पडणार आहे. परंतु काही टेक्नोसोव्ही किंबहुना काही ज्ञानी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे. हॅशटॅग विशिष्ट प्रोग्रामिंग द्वारे बनवण्यात आला आहे. यामुळे जेव्हा एखादा यूजर हा हॅशटॅग वापरतो तेव्हा एक टेक्निकल ग्लीच किंवा ज्याला आपण एरर म्हणू शकतो असा एरर त्यामुळे येतो आणि इंस्टाग्राम आपोआप लॉग आऊट होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह