नागरिकांनो लक्ष द्या : मेगा ब्लॉकमुळे या गाड्या झाल्या रद्द !

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२३ ।  नाशिक जिल्ह्यातील नांदगाव स्थानकात रिमोल्डिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील आठ रेल्वेगाड्या रद्द, तर पाच रेल्वेगाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत.

jalgaon railwahy jpg webp

गाड्या रद्द
२९ मे रोजी भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, पुणे- भुसावळ एक्स्प्रेस, नागपूर- मुंबई एक्स्प्रेस.
३० मे रोजी भुसावळ- इगतपुरी पॅसेंजर, इगतपुरी- भुसावळ पॅसेंजर, मुंबई- नागपूर एक्स्प्रेस, देवळाली- भुसावळ एक्स्प्रेस, तसेच भुसावळ- पुणे एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मार्गात बदल
३० मे रोजी नांदेड- निजामुद्दीन एक्स्प्रेस ही गाडी अकोला-भुसावळमार्गे वळविण्यात आली आहे. ३० रोजी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस अकोला- भुसावळमार्गे जाईल. अमृतसर- नांदेड सचखंड एक्स्प्रेस ही अमृतसरहून २९ रोजी सुटणारी गाडी भुसावळ कॉर्ड लाइन, अकोलामार्गे जाईल.
२८ रोजी एर्नाकुलम – निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस एर्नाकुलम येथून रोहा, वसई, उधना, जळगावमार्गे जाईल, तसेच २९ रोजीची निजामुद्दीन- एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस जळगाव, उधना, वसई रोहामार्गे जाईल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now