गुन्हेमुक्ताईनगर

मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात झायलो पलटी, एक ठार, सहा जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२२ । मुक्ताईनगर शहरापासून पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील पिंपरीअकराऊत गावाजवळ मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात झायलो गाडी पलटी होऊन चिंचखेडा बुद्रुक येथील एक जण ठार झाला. तर झायलोतील सहा जण जखमी झाल्याची घटना 17 मार्च रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.

यासंदर्भात, फिर्यादी प्रमोद सुपडू वाघ (वय 45 व्यवसाय शेती राहणार चिंचखेडा बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीकृष्ण केशव गावंडे राहणार चिंचखेडा बुद्रुक याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची राखाडी रंगाची झायलो गाडी क्रमांक एम एच एकोणावीस एक्स 3825 भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून समोरून येणाऱ्या मोटरसायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीचा ताबा सुटला.

यात गाडी डीवाईडर ला ठोकली गेली. त्यामुळे कारचे टायर फुटून गाडी पलटी झाली. या अपघातात कारमध्ये बसलेले संजय सुपडू वाघ वय 49 वर्ष राहणार चिंचखेडा बुद्रुक हे मयत झाले, तर श्रीकृष्ण केशवराव गावंडे,प्रताप भाऊराव गावंडे, श्रीराम सिताराम धायडे, उमराव उमाकांत गावंडे, नितीन उमाकांत गावंडे, दिनकर जगन्नाथ देशमुख हे सर्व राहणार चिंचखेडा बुद्रुक तालुका मुक्ताईनगर हे सर्व सहा जण गंभीर जखमी झाले असून मुक्ताईनगर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button