⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

जळगावात बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचा छापा; ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२३ । वेगवेगळ्या कंपनीच्या ओरीजनल प्रॉडक्ट सारखे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्यांवर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून अटक केलीय. त्यांच्याकडून सुमारे ७ लाख ५ हजार ७४५ रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमका काय आहे प्रकार
जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीच्या ओरीजनल प्रॉडक्ट सारखे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करत असल्याची गोपनिय माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी सिध्देश शिर्के यांना समजली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांची भेट घेवून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत छापा टाकला.

यात नेहरू नगरात राहणारा जयप्रकाश नारायणदास दारा आणि गायत्री नगरातील आकाश राजकुमार बालानी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून सुमारे ७ लाख ५ हजार ७४५ रूपये किंमतीचा झेंडूबाम, इनो सिक्सर, आयोडेक्स बाटल्या, हार्पीक पावर, डेटॉल साबन, शैंपूच्या पुड्या, सर्फ एक्सलचे पााऊच असा बनावट मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कंपनीचे फिल्ड अधिकारी सिध्देश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जयप्रकाश नारायणदास दारा आणि आकाश राजकुमार बालानी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.