एरंडोल:- जुन्या धरणगाव रस्त्यालगतच्या पद्माई पार्कमध्ये दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रवीण केदार यांच्या बंद निवास्थानी कुलूप तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला.

अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाट तोडले असता पैसे दाग दागिने व पैसे शोधण्यासाठी कपाटातील कपडेलत्ते व इतर सामान कपाटा बाहेर फेकले परंतु सुदैवाने त्यांच्या हाती काही लागले नाही असे घर मालक प्रवीण केदार यांनी सांगितले.
केदार यांच्या निवासस्थानाला लगत असलेल्या एका कापड दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरा च्या फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे असल्याचे आढळून आले परंतु त्यांची ओळख पटली नाही
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला या घटनेबाबत पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत काही नोंद झालेली नव्हती. मात्र घर मालक असलेले माध्यमिक शिक्षक प्रवीण केदार यांनी चोरी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
या कारणांमुळे पद्माईपार्क परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.