जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२२ । भुसावळ येथील दीपनगरात २१० प्रकल्पात सुरक्षा रक्षकांना दोन जण भंगार चोरी करताना दिसून आले असता. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आधीच चोरटे दुचाकी साेडून पळून गेल्याची घटना रविवारी रात्री ११.३० वाजता घडली. या प्रकरणी प्रकल्पाचे कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल वाघोदे यांच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
संशयित नशीरशहा जनाबशहा (रा.फेकरी) व संजय रामचंद्र मुंदडा (रा.झेडटीएस, फेकरी शिवार, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. वाघोद हे २ जानेवारीला ड्युटीवर असताना गॅस गोदामात चोरी होत असल्याची माहिती त्यांना सुरक्षा रक्षकांनी दिली. त्यांनी ड्युटी अधिकारी राजेश तळेले यांच्यासह मिळालेल्या माहितीवरून गाेदामाकडे धाव घेतली. यावेळी वरील दोघे चोरटे दुचाकी (एमएच.१९.डीए.४७४०) सोडून पसार झाले. घटनास्थळी सुमारे ४ हजार रुपये किमतीच्या अॅल्युमिनिअम केबल ट्रेसह अन्य साहित्य मिळून आले.

हे देखील वाचा :
- जामनेर हादरले ! आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या
- जळगावात 62.07 ग्रॅम एमडीसह आरोपी जेरबंद; ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त
- आरपीएफची भुसावळ स्थानकावर धडक कारवाई; अमृत भारत एक्स्प्रेसमधून लाखोंचा गांजा जप्त!
- अमळनेर पोलिसांचे धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’; गावठी पिस्टल, तलवारीसह अवैध धंद्यांवर मोठी कारवाई!
- मोजणीच्या कामासाठी शेतकऱ्याकडून ७१ हजारांची लाच; जळगावातील भूकरमापकासह डेटा ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात







