गुन्हेजळगाव शहर

जळके येथे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२२ । जळगाव तालुक्यातील जळके गावातील बसस्थानक नजीक असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी आधी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले नंतर मशिन फोडण्याचा प्रयन्त करण्यात आला मात्र ते फोडण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी तेथून पोबारा केला. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

काय आहे घटना?
जळके गावातील वावडदा रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीमएम असून शनिवारी मध्यरात्री एटीएम मशिनच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी एटीएममध्ये लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडले आणि एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, चोरट्यांकडून एटीएम मशिन न फुटल्याने एटीएम मशिनमधील कॅश सुरक्षीत राहिली असून चोरटयांचा प्रयत्न फसला. एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आज सकाळी स्टेट बँकेचे व्यवस्थापक दीपक तिवारी यांनी एटीएमची पाहणी केली. यावेळी त्यांनी एटीएम मशिनचे कुठलेही नुकसान झाले नसल्याने त्यांनी तक्रार देणार नसल्याचे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button