जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । जिल्हा बँकेच्या संचालिका ऍड.रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू असून ऍड.रोहिणी खडसे व आ.चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे.
सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेच्या संचालिका ऍड.रोहिणी खडसे या मानेगाववरून हळदीच्या कार्यक्रमाला भेट देऊन मुक्ताईनगरकडे येत असतांना त्यांच्या चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीसी.१९१९ या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. याप्रसंगी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा ड्रायव्हर होता. यात कोयत्याच्या मदतीने त्यांच्या गाडीच्या काचावर आघात करण्यात आल्याचे समजते. या हल्ल्यात ऍड.रोहिणी खडसे यांना काही दुखापत झाली नाही. मात्र हल्लेखोर काही क्षणात फरार झाले. हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याचे दिसून आले आहे.
तीन दिवसांपूर्वीच ऍड.रोहिणी खडसे मतदारसंघात महिला सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यास प्रत्युत्तर दिले आहे. खडसे आणि पाटील यांच्यात चांगलाच वाद सुरू असताना आजची घटना घडली आहे.
हे देखील वाचा :
- इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (IGI) चा IPO बाजारात दाखल; किती रुपयांनी उघडला?
- हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन
- UI चित्रपट पाहिल्यानंतर तुमचे मन हेलावेल, पाहण्यापूर्वी नेटकरी काय म्हणताय? जाणून घ्या.
- गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी इलाईट पदग्रहण सोहळा
- रोटरॅक्ट क्लब ऑफ डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज इलाईटचा पदग्रहण सोहळा