जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२२ । महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे दिसतेय. अशातच इन्टाग्रामवर मैत्री करून ३३ वर्षीय विवाहितेवर हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. तसेच व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी दिली. याप्रकरणी संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय ४८) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमका प्रकार?
जळगाव (Jalgaon) शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबीयांसह वास्तव्यास असलेल्या ३३ वर्षीय विवाहिता ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून संसाराला हातभार लावते. त्यांचे इन्ट्राग्राम या सोशल मिडीया (Social Media) साईटवरवर त्यांचे खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी (वय ४८) याची ओळख झाली. इन्ट्राग्रामवर (Instagram) मैत्री झाल्याने फेशीयल करण्याचे कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी हा घेवून गेला.
विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनविला. व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग सुरु केले. प्रकरण चिघळत चालले असल्याने तीने पतीला विश्वासात घेत सर्व सांगीतल्याने पतीनेही तिची साथ दिली. विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक निरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहे.