⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणागावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार !

धरणागावात आदिवासी बांधवांसाठी सांस्कृतिक भवन उभारणार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आदिवासी समाजाच्या मेळाव्यात प्रतिपादन

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२४ । आदिवासी समाजाच्या खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी आदिवासी बांधवांनी शिक्षणाला महत्व दिले पाहिजे. भविष्यातही एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून पासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही देवून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. मंजूर 10 कोटी निधीतून मतदार संघातील 51 गावांतील आदिवासी वस्त्यांवर सौर दिवे बसविले जाणार असून माझ्यासह शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे‌. असा विश्वास व्यक्त करून धरणगावात तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी भव्य सांस्कृतिक भवन उभारणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते आदिवासी दिनाच्या व महसूल पंधरवाड्या निमित्ताने धरणगाव येथे जी. एस. लॉन्सवर आयोजित आदिवासी बांधवांच्या मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी मनोज कुमार गायकवाड हे होते.

पालकमंत्री बोलताना पुढे म्हणाले की आदिवासी लाभार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करत आहे. यावर्षी चांदसर सह जिल्ह्यात तब्बल सहा शाळा , एक वस्तीगृह बांधकामासाठी कोट्यावधी निधी मंजूर असून तालुक्यात ख्वाजाजी नाईक स्मारकाचे काम सुरु आहे. आदिवासी बांधवांनी एकजुटीने उभे राहून लाडकी बहिण योजनेसाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल श्रीफळ व धनुष्यबाण देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी “धनुष्यबाणाच्या अस्मितेसाठी” सतत झटत राहणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात तहसीलदार सूर्यवंशी यांनी महसूल पंधरवावाड्यात राबविण्यात आलेले उपक्रमाविषयी व जागतिक आदिवासी दिनानिमित्त सविस्तर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक आर. डी. महाजन सर यांनी केले. तर आभार गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मांनले. यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे व राज्याचे टायगर सेनेचे प्रवक्ते पंढरीनाथ मोरे यांनी पालकमंत्र्यांनी आदिवासी समाजासाठी केलेल्या कामाविषयी आभार व्यक्त करून घरकुल धारकांना मोफत जागा उपलब्ध करून द्या, वन हक्क कायद्याच्या जाचक अटी रद्द कराव्यात, धरणगाव येथे सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे यासह ११ मागण्या मागत मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक , भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील 374 जातीचे सर्टिफिकेट, 112 रेशन कार्ड आणि 453 उत्पन्नाचे दाखलेतसेच आदिवासी घटकांच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ व दाखले वाटप करण्यात आले. व्यासपीठावर प्रांताधिकारी मनोजकुमार गायकवाड , तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, आदिवासी टायगर सेनेचे राज्य प्रवक्ते पंढरीनाथ मोरे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, शहर प्रमुख विलास महाजन, आदी मान्यवर व्यासपीठावर तर आदिवासी टायगर सेनेचे जिल्हास्तरीय पदाधिकारी संभाजी सोनवणे, विकास मालचे, सुनील सोनवणे, शरद पवार, विजय मालचे, रामचंद्र वाघ, गटनेते पप्पू भावे, रविंद्र कंखरे, बूट्या पाटील, यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी व आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.