⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, परस्परविरुद्ध गुन्हा

महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण, परस्परविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । १८ जून २०२२ । पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील एका ४५ वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील फिर्यादी विरुध्ददेखील आरोपींनी गुन्हा दाखल करण्यात आला.

आखतवाडे येथील अलका धिवरे (वय – ४५) यांनी गावातील दौलत देशमुख यांच्या जागेवरुन सोना गढरी यांनी दगड उचलून नेल्याचे सांगण्याच्या संशयावरुन आरोपी सोना गढरी, दिपाली गढरी, कैलास गढरी व परमेश्वर गढरी सर्व रा. आखतवाडे यांनी फिर्यादी अलका धिवरे यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाठ्या काठ्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण करत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने अलका धिवरे यांच्या फिर्यादीवरून सोना गढरी, दिपाली गढरी, कैलास गढरी व परमेश्वर गढरी यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे हे करत आहेत.”

आरोपींचाही फिर्यादीसह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आखतवाडे ता. पाचोरा येथील सोना गढरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून “रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलका धिवरे सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादीच्या घरासमोर येऊन आरोळ्या मारत शिवीगाळ करत असतांना त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या सोनाबाई गढरी यांना आरोपी रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलका धिवरे यांनी घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन फिर्यादीस मारहाण करत यातील रविंद्र धिवरे व अमोल धिवरे यांनी सोना गढरी यांच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याने सोना गढरी यांच्या फिर्यादीवरून रविंद्र धिवरे, अमोल धिवरे व अलका धिवरे यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास पाटील हे करत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह