जळगाव जिल्हाजळगाव शहर
मनपाच्या सहाय्यक आयुक्त पदी अश्विनी गायकवाड
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । जळगाव महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी अश्विनी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी गुरुवारी सकाळी महापालिकेत येवून पदभार स्विकारला.(ASHWINI GAYAKVAD JALGAON MNP)
अश्विनी गायकवाड हे मुक्ताईनगर येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. मुक्ताईनगर येथे तीन वर्ष सेवा पुर्ण झाल्यानंतर त्यांची बदली जळगाव महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी करण्यात आली आहे. यापुर्वी त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदी काम केले आहे.