अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

नोव्हेंबर 20, 2024 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज २० नोव्हेंबर २०२४ । जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी आपले मतदान केले.

jain vote

जैन परिवारातील सदस्यांचे मतदान एम.जे. कॉलेज जवळील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रात होते. त्यांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदान करून भाग घेतला. जैन परिवारातील अशोक जैन, सौ. ज्योती जैन, आरोही जैन, अजित जैन, सौ. शोभना जैन, अतुल जैन व डॉ. भावना जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now