जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ । रावेर तालुक्यातील वाघोदा गावी माळी वाडा येथे नवरा फारकत देत नसल्याने घरी जाऊन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत सावदा पोलिसांत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज भादू भालेराव (वय ६५, मोठा वाघोदा, ता. रावेर जळगाव ) यांनी सावदा पोलिसांत तक्रार दिली. भालेराव हे शेती करून आपले उदरनिर्वाह करतात. दि. १६ रोजी युवराज भादू भालेराव यांच्या घरासमोर अंगणात संशयित आरोपी पंचशीला उर्फ सोनाली आनंद भालेराव या आल्या व त्यांना तुमचा मुलगा मला फारकत का देत नाही.म्हणत आरोडओरोड करून शिवीगाळ केली. व संशयित आरोपी नितीन सपकाळे, प्रथम कुलकर्णी (रा.उंटखेडा रावेर) यांनी फिर्यादीस खाली पाडून नाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या प्रकरणी युवराज भादू भालेराव यांनी सावदा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी पंचशीला उर्फ सोनाली आनंद भालेराव, नितीन सपकाळे, प्रथम कुलकर्णी (रा.उंटखेडा रावेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विनोद पाटील करत आहेत.