जळगाव शहरातील तब्बल १५ हजार कुत्र्याचं झालं निर्बीजीकरण
जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२३ । एकीकडे जळगाव शहरांमध्ये कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले पाहायला मिळत आहे. अशावेळी नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने कुत्रा निर्बीजीकरणाचे काम गेल्या दोन वर्षापासून एका संस्थेला दिले आहे. या संस्थेने गेल्या दोन वर्षात तब्बल 15000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले असल्याची माहिती समोर येत आहे.
महानगरपालिकेच्या सूत्रांच्या माहितीनुसार जळगाव शहरातील तब्बल 15000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. मोकळ्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत असल्याच्या घटना शहरात घडत आहेत. मात्र महापालिकेने तब्बल 15000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेच्या जुना खत कारखान्याच्या जागेत निर्बीजीकरणाचे काम सुरू आहे.
महानगरपालिकेच्या मते सुमारे 60 हजार कुत्रे हे जळगाव शहरात आहेत. ज्यापैकी पंधरा हजारांच निर्बीजीकरण करण्यात आलं आहे. वास्तविक दृष्ट्या हा आकडा मोठा दिसत असला तरी महानगरपालिकेच्या मते 15000 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आलं आहे. यामुळे महानगरपालिकेचा हा दावा अजब म्हटला तरी काही चुकीचे वाटणार नाही.
एका कुत्र्यामागे महानगरपालिका ठेकेदाराला तब्बल 938 रुपये मोजत आहे अशावेळी 15000 कुत्र्यांच्या मागे महानगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला गेल्या दोन वर्षात १ कोटी ४० लाख ७० हजार रुपये मोजले आहेत.
जळगाव शहरात ६० हजार कुत्रे
सरासरी 100 माणसांच्या तुलनेत सात ते आठ कुत्रे हे वास्तव्यास असतात अशा निकष लावला जातो. त्याचप्रमाणे 2011 च्या जनगणनेनुसार जळगाव शहरात ६० हजार कुत्रे आहेत. यातील पंधरा हजार कुत्र्यांचं निर्मितीकरण गेल्या दोन वर्षात संबंधित संस्थेने केला आहे