मी उपमहापौर असेपर्यंत अनधिकृत बेसमेंटवर कारवाई होणारच – उपमहापौर कुलभूषण पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । कुलभूषण पाटील उपमहापौर पदी विराजमान झाल्यापासून जळगाव शहरातील अनाधिकृत बेसमेंटवर कारवाई करणारच अशी कित्येकदा घोषणा करूनही शहरातील अनाधिकृत बेसमेन्ट वर कारवाई होत नसल्याने आता त्यांनी केलेल्या घोषणा या नुसत्या बाता झाल्या आहेत अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य जळगावकर देत आहेत.दरम्यात मी उपमहापौर असेपर्यंत अनधिकृत बेसमेंटवर कारवाई होणारच असा निर्धार उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केला आहे.
बांधकाम परवानगी घेताना पार्किंगची जागा दाखवली; परंतु प्रत्यक्षात वापर करताना मात्र व्यावसायिक वापर सुरू असल्याचे निष्पन्न होऊनही अजून शहरातील अनाधिकृत बेसमेंट वर कारवाई करण्यात आलेली नाही. नेहरू चौक ते टॉवर चौक दरम्यानच्या २८ व्यावसायिक प्रतिष्ठानांना सकारण आदेश बजावले होते. मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हंणजे उपमहापौर कुलभूषण पाटील हे देखील याक्षणाला याकडे दुर्लक्ष करत आहेत.सुरतीला मी या अनाधिकृत बेसमेन्ट वर कारवाई करणारच अशी घोषणा केली.मात्र ती आता वल्गना झाली असून त्यांच्याच दिलेला शब्द ते पाळू शकत नाहीयेत. यामुळे आता या अनधिकृत बेसमेन्ट वर कारवाई होणार कि नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिका क्षेत्रात पार्किंगची समस्या डोके वर काढत आहे. प्रमुख वर्दळीच्या एकाही रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नाही. जी व्यापारी संकुले व दुकानांसमोर वाहने उभी दिसतात त्या दुकानांच्या बेसमेंटमधील पार्किंग केवळ कागदावर आहेत. प्रत्यक्षात व्यावसायिक वापर करून पैसे कमावले जाताहेत. त्याचा परिणाम रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत असून वाहतुकीचा खोळंबा होतो आहे.या संदर्भात सर्वेक्षण केले होते. त्यात ३० पैकी २८ ठिकाणी पार्किंगची जागा आर्थिक कमाईसाठी गिळंकृत केल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रतिष्ठानांची सुनावणी होऊन त्यांच्यावर कारवाईसाठी सकारण आदेश बजावले जाणार होते मात्र अजून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही.