जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जानेवारी २०२२ । अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी विद्या मंदिरातील पाचवीचा विद्यार्थी आरुष हेमंतकुमार बाविस्कर याने मराठी माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय व अमळनेर तालुक्यातून ही द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
त्याला ३०० पैकी २४६ गुण मिळाले. त्याला मुख्याध्यापक व वर्गशिक्षक व आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले. ताे रणाईचे येथील प्राथमिक आश्रम शाळेचे शिक्षक हेमंत दगाजीराव बाविस्कर व शिरसाळे येथील शिक्षिका योगिता हेमंत बाविस्कर यांचा चिरंजीव आहे. त्यास समाधान खैरनार व तृप्ती खैरनार यांचेही मार्गदर्शन लाभले.
हे देखील वाचा :
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..