जळगाव जिल्हा
बंजारा क्रांती दलाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अरुण पवार यांची निवड
जळगाव लाईव्ह न्युज। १६ एप्रिल २०२२ । पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील अरुणसिंग बाबुसिंग इसाळावत उर्फ अरुण पवार यांची बंजारा क्रांती दलाच्या प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रमुखपदी नुकतीच निवड झाली आहे.
हि नियुक्ती बंजारा क्रांती दल (महाराष्ट्र प्रदेश) चे संस्थापक अध्यक्ष देविदास राठोड यांनी केली. बंजारा क्रांती दलाचे कार्य प्रदेश, विभाग, जिल्ह्यात अधिक प्रभावी व जोमाने वाढविण्याची जबाबदारी अरुण पवार यांना देण्यात आली आहे. अरुण पवार हे तालुक्यात परिचीत असुन त्यांच्या जनसंपर्काचा निश्चितच बंजारा क्रांती दलास फायदा होणार आहे. अरुण पवार यांनी तालुक्यासह उत्तर महाराष्ट्रात गाव तेथे बंजारा क्रांती दल स्थापन करण्याचा मनोदय त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.