चोपड्यात गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक, एक गावठी कट्टा व चार काडतुस जप्त!

सप्टेंबर 1, 2022 3:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयितास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्यापथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, चार काडतुस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon 25 jpg webp

कडू होंडाळे रा. नशिराबाद ता. जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पार उमर्टी ता. वरला जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश येथून गावठी कट्टा आणला होता. दरम्यान, त्यास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन यांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 94 हजार रुपयांच्या मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे.

Advertisements

चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पो.नि. देविदास कुनगर यांच्यासह त्यांचे सहकारी हे.कॉ. राकेश पाटील, हे.कॉ. शिंगाणे, संजय येंदे तसेच विशेष पथकातील सहायक फौजदार बशीर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now