गुन्हेजळगाव शहर

‘त्या’ समाजाबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्याला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । शहरात दोन लोकांमध्ये झालेल्या संभाषणाची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याचा प्रकार उघडीस आला होता. त्यात द्वारकानगरातील तरुणाशी मोबाईलवर संवाद साधताना मालधक्क्यावरील कंत्राटदार संजू पटेल याने बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह्य वक्तव्य केले. त्यानंतर संशयिताला शहर पोलिसांनी सकाळीच अटक केली, यावेळी समाजबांधवांनी गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात एकच गर्दी केली होती. दरम्यान, निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.

सूत्रानुसार, जळगाव शहरात दूध फेडरेशनमागील राजमालतीनगरातील संमिश्र वस्तीत संजू बिस्मिल्ला पटेल दोन- तीन भावंडाच्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. रेल्वे मालधक्क्यावर हमाल पुरविणे, रेशन मालाची ने-आण करण्यासह परिसरात बऱ्यापैकी दहशत या कुटुंबाने निर्माण केली आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघा-तिघा भावंडानी एका घरात घुसून तरुणाला बेदम मारहाण केली होती.

तेव्हाही गुन्हा दाखल झाला होता. मात्र, आता चक्क मोबाईल संभाषणातून बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह्य वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. या घटनेची तत्काळ दखल घेत पोलिस निरीक्षक विजय ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजय निकुंभ, रतन गिते, तेजस मराठे, भास्कर ठाकरे यांनी संजू पटेल याला राजमालतीनगरातून अटक केली.

दूध फेडरेशन, राजमालतीनगर, रेल्वे मालधक्का परिसरात माजी नगरसेवक राजू पटेल, त्याचा भाऊ संजू पटेल व त्यांच्या मुलांची प्रचंड दहशत आहे. गोरगरीब हमाल, मजुंरावर या लोकांचा दबदबा असून, यापूर्वीही सुरवाडे कुटुंबियांवर त्यांनी हल्ला चढविला होता. रेशनचा काळ्या बाजारात विक्री होणारा ट्रकभर तांदूळ जप्त करण्यात आला होता.

दरम्यान, संजू पटेल याच्या जातीयवादी वक्तव्यामुळे संतप्त जमावाने शहर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी संबंधितांशी चर्चा केली व संशयितला अगोदरच पोलिसांनी अटक केल्याची माहिती देऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button