⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | अल्पवयीन तरुणीची बदनामी, संशयित वर्षभरापासून पोलिसांना देत होता गुंगारा, त्या एका चुकीने असे घेतले ताब्यात

अल्पवयीन तरुणीची बदनामी, संशयित वर्षभरापासून पोलिसांना देत होता गुंगारा, त्या एका चुकीने असे घेतले ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । शहादा येथील संशयित तरुणाने धरणगाव येथील अल्पवयीन मुलीचा फोटो, बदनामीकारक मजकूर लिहून सोशल मीडियावर मजकूर व्हायरल केल्याची घटना गेल्यावर्षी घडली होती. याप्रकरणी धरणगाव पोलिस ठाण्यात संशयित अस्लम सलीम खान याच्याविरुद्ध नोव्हेंबर २०२१ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, संशयित जाळ्यात अडकला आहे. पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी सोमवारी संशयिताला शहादा पोलिसांच्या मदतीने अटक केली.

यासंदर्भात पीडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या लहान मुलीचा साखरपुडा अस्लमखान सलीम खान (रा. शहादा) याच्यासोबत धरणगाव येथे झाला होता. त्यानंतर पीडीतेवर संशय घेऊन अस्लम खान याने त्याचे आई-वडील आणि नातेवाईकांना सोबत घेऊन साखरपुडा मोडून टाकला होता. धक्कादायक म्हणजे साखरपुडा मोडल्यानंतर अस्लम हा पीडीतेच्या मोबाईलवर फोन करून सतत त्रास देत होता. माझ्याशी लग्न नाही केले तर मी मरून जाईल, असे तो सांगत होता. १४ नोव्हेंबर २०२१ रोजी पीडीतेचे वडील बारामती तेथे असतांना मुलीचे फोटो व्हायरल केल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अस्लम सलीम खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी केली अटक
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पसार होता, तो वेळोवेळी सिमकार्ड बदल करत होता. त्यामुळे त्याचे लोकेशन कळत नव्हते. एक दिवस पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना अस्लमचा मोबाईल नंबर गोपनीय सूत्रांनी दिला. त्यानंतर शेळके यांनी त्याचे लोकेशन काढले. तो शहादा येथे असल्याने तेथील पोलिसांची मदत घेत सोमवारी सायंकाळी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी पहाटे पथकाने संशयिताला धरणगावात आणले. संशयिताला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.