⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | १५ दिवसात दुसरे तर आजपर्यंत १३ लग्न करणारी भामटी वधू गजाआड

१५ दिवसात दुसरे तर आजपर्यंत १३ लग्न करणारी भामटी वधू गजाआड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । पैसे घेऊन लग्न करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचे बिंग अमळनेर तालुक्यातील मारवड पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटले. नवरीसह तिची मावशी, मामा व अन्य तिघे अशा सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे १५ दिवसांत हे दुसरे अन् आतापर्यंतचे १३ वे लग्न होते.

याबाबत असे की,  मंदाणे ता शहादा येथील भूषण संतोष सैंदाणे याचे ६ मे रोजी लग्न सोनू राजू शिंदे रा सिद्धार्थ नगर हिंगोली हिच्याशी लग्न झाले होते. १५ मे रोजी ती घरातून पळून गेली १६ मे रोजी भूषण ने शहादा पोलीस स्टेशनला हरवल्याची फिर्याद दिली. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल दीपक परदेशी व विश्वास साळुंखे करीत होते. ही मुलगी कपिलेश्वर मंदिरावर काल शुक्रवारी 21 रोजी दुसरे लग्न करणार आहे, अशी माहिती मारवड पोलिसांना मिळाली.

त्यानुसार मारवड पोलिस स्टेशनचे एपीआय राहुल फुला ,हेडकॉन्स्टेबल बबलू होळकर, अनिल राठोड व होमगार्ड चारुदत्त पाटील यांनी तातडीने कपिलेश्वर मंदिर गाठले तेथून लग्न करणारी टीम मुडावद तालुका शिंदखेडा येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यांचा पाठलाग केला असता तेथून ते पडावद येथे गेल्याचे समजले राहुल फुला यांनी तातडीने नरडाणा पोलिसांना कळवले व तिकडून पथक मागवले. पडावद येथे सोनू ही प्रवीण शिवाजी पाटील यांच्याकडे लग्न सोहळा करीत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी तातडीने सोनू व तिची मावशी पूजा प्रताप साळवे रा सिद्धार्थ नगर हिंगोली तसेच तिचा मामा योगेश संजय साठे रा शिवसेना नगर ता अकोला यांना त्यांच्या चार चाकी वाहनासह अटक केली. मुलीची आई व भाऊ पळून गेले आहेत.

आरोपीना नरडाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नरडाना पोलिसांकडून ते शहादा पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.