महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात 1440 जागांसाठी मेगाभरती, भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?

नोव्हेंबर 5, 2025 3:12 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुमचेही महाराष्ट्र शासनाच्या सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न असेल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. सरळसेवेच्या कोट्यातून ही सर्वात मोठी पदभरती जाहीर केली आहे.

nhm

सार्वजनिक आरोग्य विभागाने गट अ (मेडिकल ऑफिसर ग्रुप ए ) पदासाठी ही भरती होणार असून या भरतीद्वारे तब्बल १४४० रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

Advertisements

आवश्यक पात्रता काय?

आरोग्य विभागातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने M.B.B.S असणे गरजेचे आहे. याचसोबत वैद्यकीय क्षेत्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.

Advertisements

किती पगार मिळेल: या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) वेतनश्रेणी मिळणार आहे. दरमहा 56100 ते 177500 पर्यंत

समांतर आरक्षणाचा तपशील:

महिलांसाठी आरक्षण: या भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांसाठी एकूण ४३१ जागा राखीव आहेत.
खेळाडूंसाठी आरक्षण: प्राविण्यप्राप्त खेळाडूंसाठी ७२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
अनाथ आरक्षण: अनाथ उमेदवारांसाठी एकूण १४ पदे राखीव आहेत.
दिव्यांग आरक्षण: नियमानुसार एकूण ५७ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव आहेत, ज्यात अस्थिव्यंग (Locomotor Disability) असलेल्या उमेदवारांना प्राधान्य आहे.

अधिक माहितीसाठी : सार्वजनिक आरोग्य विभाग मूळ जाहिरात बाबत शुद्धीपत्रक पाहा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now