⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

विरावली सोसायटीच्या चेअरमनपदी अर्जुन पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । विरावली येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलचे अर्जुन पाटील चेअरमनपदी तर व्हा,चेअरमनपदी नरेंद्र दयाराम पुढे यांची एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.जे. तडवी यांनी काम पाहिले. या निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरस्कृत परिवर्तन पॅनलला १२ पैकी १० तर शिवसेना पुरस्कृत शेतकरी एकता पॅनलला केवळ २ जागा मिळाल्या होत्या.

यावल-रावेर विधानसभाचे आमदार यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित चेअरमन, व्हा-चेअरमन व संचालक मंडळ यांचा शॉल श्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, पं.स.गटनेते तथा पं.स. सदस्य शेखर पाटील, रा.काँ. चोपडा विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे, उंटावद वि.सो. नवनिर्वाचित चेअरमन शशिकांत पाटील, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष तथा वाढोदे गावातील सरपंच संदीप भैया सोनवणे, नावरे गावातील माजी सरपंच समाधान पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, सहकर मध्ये शेतकरी सभासदांचे हित लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकरी सभासदांचा संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारे फायदा करता येईल यावर भर द्या. तसेच संस्थेला उत्पन्नाचे स्रोत वाढले पाहिजे, संस्थेच्या माध्यमातून विकास करण्याचे आमदारांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा विरावली ग्रा.प.सदस्य ॲड. देवकांत पाटील, नवऱ्याचे माजी सरपंच समाधान पाटील, माजी वि.का.सो विरावली माजी चेअरमन संजय पाटील, माजी संचालक शरद राजपूत सुभाष पाटील, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, गिरीश पाटील, माजी ग्रा.प.सदस्य रणधीर पाटील, माजी ग्रा.प.सदस्य दगडू तडवी, प्रदीप पाटील, गणेश पाटील, धीरज महाजन आदीनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरवाडे तडवी व कृष्णा पाटील, राज पाटील, गौरव पाटील आदींनी परिश्रम घेतले.