⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास अखेर मंजुरी; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांना होणार लाभ

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास अखेर मंजुरी; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांना होणार लाभ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२४ । गेल्या अनेक वर्षांपासून बहूप्रतीक्षेत असलेल्या नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिली आहे, तशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्विट करत देण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, वैनगंगा-नळगंगा पाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला सुद्धा राज्यपाल महोदयांनी मंजुरी दिली आहे. मी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचा अतिशय मनापासून आभारी आहे.या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. दरम्यान, सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

तसेच या योजनेमध्ये ९ धरणे प्रस्तावित आहेत. त्यातून २६०.३० दलघमी पाणी ऊर्ध्वगामी नलिकेद्वारे उपसा करुन चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे ७९.९२ कि.मी. लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे प्रस्तावित आहे.

असा आहे प्रकल्प
नार-पार या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यासाठी साधारण साडेसहा ते सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे. यामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.