जळगाव लाईव्ह न्यूज । २८ डिसेंबर २०२१ । सावदा पालिकेच्या उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 30 रोजी पदभार कार्यभार हातात घेणार आहेत.
सविस्तर असे की, सावदा पालिकेचे या पंचवार्षिकची मुदत 29 रोजी संपत आहे. त्यामुळे 29 डिसेंबर ही यापालिकेतील सर्व सदस्यांचा कार्यभाराचा शेवटचा दिवस असणार असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक ३० डिसेंबर रोजी प्रशासक बसवावे असे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार महराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मुदत संपली आहे. तेथे प्रशासक बसण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार सावदा पालिकेत सुद्धा प्रसासक नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले. त्यानुसार येथे दि.30 पासून फैजपूर येथील उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 30 रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत.
शासन आदेश संपूर्ण जगभर पसरलेल्या साथरोग कोविड -१९ च्या राज्यात झालेल्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणूकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने संदर्भ क्र. १ च्या अनुषंगाने मुदत समाप्तीनंतर संबंधित नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील तरतुदी व अंतर्भूत केलेल्या कलम ३१७ ( ३ ) मधील तरतुदीनुसार सोबत जोडलेल्या सहपत्रातील तपशीलाप्रमाणे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांची आपल्या विभागातील संबंधित नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्यात येत आहे.
नगरपरिषदा व नगरपंचायतीची मुदत संपताच तेथे नमुद केल्यानुसार संबंधित उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व मुख्याधिकारी यांच्या नावाने आपल्या स्तरावरुन आदेश काढून सदर अधिकान्यांना प्रशासक पदाचा कार्यभार स्विकारण्याबाबत सूचित करावे, तसेच अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत देखील सूचित करावे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, (महेश पाठक) प्रधान सचिव (नवि -२ ) यांचे २७ रोजीचे आदेश जारी करण्यात आले आहे. त्या नुसार फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांची यावल, फैजपूर, सावदा, व रावेर या चारही पालिकावर प्रशासक म्हणून नुयक्ती झाली असून ते पदभार स्वीकारणार आहे.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात