⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुदत संपलेल्या बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील आठ मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २४ एप्रिल २०२१ पासून २३ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. मात्र संचालक मंडळाला २३ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतर आता संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जळगावसह भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, चोपडा, बोदवड व पारोळा या आठ कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक लवकरच होणार असल्याचे संकेत देखील यातून मिळाले आहेत. सहा महिने किंवा निवडणूक होऊन संचालक मंडळ कार्यरत होईपर्यंत प्रशासक नेमण्याचे सहकार विभागाने आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आठ बाजार समितींवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.