जळगाव शहर
जिल्ह्यात साथरोग नियंत्रणासाठी ९४ पथकांची नियुक्ती
जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा फैलाव होतो. त्या अनुषंगाने साथ रोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ९४ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यात जिल्हास्तरावर २ तर तालुकास्तरावर १५ तर आरोग्य केंद्र स्तरावर ७७ पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी सांगितले.
पावसाळ्यात जलजन्य साथ उद्रेक, आपत्ती, पूर समस्या आदींमुळे साथरोग फैलावण्याची शक्यता लक्षात घेता साथरोग नियंत्रण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना व इतर पथक सदस्यांना साथीबाबत माहिती मिळताच पुरेसा औषधींच्या साठ्यासह संबधित गावास भेट देण्याची सुचना या पथकांना करण्यात आलेली आहे.